पर्यटन विकासासाठी (किल्ले आणि सागरी किनारे) आवश्यक असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांचा विकास करणार.
महिला बचतगटांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आणि शहरी बाजारपेठ देण्यासाठी मार्केटिंग नेटवर्क उभारणार.
कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ आणि संगणक प्रशिक्षण केंद्रांची स्थापना तसेच हायस्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध करणार.
मत्स्य विद्यापीठ प्रश्न मार्गी लावणार, बंदराचा विकास आणि मत्स्यव्यवसायाच्या आधुनिकीकरणासाठी विशेष योजना तयार करणार.
आरोग्य यंत्रणेत बदल करणार, शासकीय रुग्णालयातून जीवनावश्यक औषधांचा २४ तास मोफत पुरवठा करण्यावर भर देणार. अवघड शस्त्रक्रिया खर्चाची मर्यादा वाढवणार.
आंबा काजू उद्योगासाठी फळप्रक्रिया केंद्रांची निर्मिती करणार आणि निर्यात वाढीवर भर देणार.
नैसर्गिक साधनसंपत्ती वर आधारित उद्योगांना चालना देणार. औषध उद्योग निर्मितीसाठी प्रयत्न करणार.
रेल्वे भरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळवून देणार आणि कोकणवासियांचा सोयीसाठी प्रवासी गाड्या आणि स्थानके यात वाढ होण्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न करणार.
मतदारसंघात अद्ययावत आणि ग्रंथदालनांनी सुसज्ज अभ्यासिकांची निर्मिती करणार, कोकण कलामहोत्सवाचे आयोजन करणार.
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांनी सुसज्ज अशी स्पोर्ट्स अकॅडमी उभारणार.