|| वचननामा ||

|| वचननामा ||

- कोकणच्या विकासाचा केंद्रबिंदू असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण.

- कोकण रेल्वेचे दुपदरीकरण.

- कोकणातील पर्यटनास चालना देणारे उद्योगधंदे मतदारसंघात आणण्यास प्राधान्य.

- जिल्ह्यांमध्ये स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र आणि त्यासाठी आवश्यक ग्रंथालय उभारण्यास प्राधान्य दिले जाईल.

- विजेची गरज भागवण्यासाठी देवगडच्या पवनचक्की प्रकल्पाच्या धर्तीवर मतदारसंघात अन्य ठिकाणी उर्जा निर्मिती करण्याचा मानस आहे.

- मतदारसंघात आणलेल्या एखाद्या प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असेल तर जनभावनेचा आदर करून तो  प्रकल्प रद्द करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

- सी वर्ल्ड, चिपी विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक तेवढीच जमीन ठेवून इतर जागा पुन्हा मूळ स्थानिकांकडे सुपूर्द करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल व स्थानिकांना उद्ध्वस्त करून सी वर्ल्ड होऊ देणार नाही.

- वेळघर सारख्या प्रकल्पासाठी जमिनी संपादित केलेल्या आहेत. मात्र प्रकल्प उभारलेला नाही. अशा पडीक जमिनी स्थानिकांना पुन्हा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

- धरणासाठी यापूर्वी शासनाने संपादित केलेल्या जमिनी जोपर्यंत धरणे बांधून पूर्ण होत नाहीत तोपर्यंत नवीन धरणांसाठी नवीन जमिनी संपादित करू देणार नाही.

- गोवा राज्याच्या धर्तीवर पर्यटन विकास करून पर्यटनाभिमुख रोजगार निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात येईल.

- सिंधुदुर्गातील मळगावलाच कोकण रेल्वेचे टर्मिनस उभारण्याचा संकल्प आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवतेविषयी कृतज्ञता म्हणून टर्मिनस चे नामकरण
"प्रा. मधु दंडवते टर्मिनस " असे करण्यात येईल.

- विनाशकारी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे.
Share by: