माझे कोकण ...माझे संकल्प...!!

माझे कोकण...माझे संकल्प...!!

  • पर्यटन विकासासाठी (किल्ले आणि सागरी किनारे) आवश्यक असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांचा विकास करणार.
  • महिला बचतगटांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आणि शहरी बाजारपेठ देण्यासाठी मार्केटिंग नेटवर्क उभारणार.
  • कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ आणि संगणक प्रशिक्षण केंद्रांची स्थापना तसेच हायस्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध करणार.
  • मत्स्य विद्यापीठ प्रश्न मार्गी लावणार, बंदराचा विकास आणि मत्स्यव्यवसायाच्या आधुनिकीकरणासाठी विशेष योजना तयार करणार.
  • आरोग्य यंत्रणेत बदल करणार, शासकीय रुग्णालयातून जीवनावश्यक औषधांचा २४ तास मोफत पुरवठा करण्यावर भर देणार.
     अवघड शस्त्रक्रिया खर्चाची मर्यादा वाढवणार.
  • आंबा काजू उद्योगासाठी फळप्रक्रिया केंद्रांची निर्मिती करणार आणि निर्यात वाढीवर भर देणार.
  • नैसर्गिक साधनसंपत्ती वर आधारित उद्योगांना चालना देणार. औषध उद्योग निर्मितीसाठी प्रयत्न करणार.
  • रेल्वे भरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळवून देणार आणि कोकणवासियांचा सोयीसाठी प्रवासी गाड्या आणि स्थानके यात वाढ होण्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न करणार.
  • मतदारसंघात अद्ययावत आणि ग्रंथदालनांनी सुसज्ज अभ्यासिकांची निर्मिती करणार, कोकण कलामहोत्सवाचे आयोजन करणार.
  • आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांनी सुसज्ज अशी स्पोर्ट्स अकॅडमी उभारणार.
Share by: